संत नागेबाबा

सहकार विश्व

अर्थसाक्षर…

आपण साक्षर आहोत पण अर्थसाक्षर आहोत का?

माझ्या लेखाचे हेडींग थोडस संभ्रमात टाकणार आहे,पण वास्तवा वर अधारीत आहे.
अर्थसाक्षरता ही सर्व समाजाची गरज आहे,अस म्हटल तर वावग ठरणार नाही.वेगवेगळ्या भुलथापांना,अमिषाला बळी पडुन स्वतःचे व कुटुंबाचे आर्थीक नुकसान करुन घेण्यात सुशिक्षीत समाजच आघाडीवर आहे.यातही ज्या समाज घटकांची समाजाला साक्षर करण्याची,दिशा दाखवण्याची जबाबदारी आहे,नेमका तोच घटक सर्वात जास्त यात अडकतो,असे लक्षात येते.
आपण कायदेशीर,सनदशीर मार्गाने कमावलेला पैसा भविष्याच्या तरतुदीसाठी योग्य परताव्या वर गुंतवणे यासाठी सर्वजण विवीध पर्याय शोधत असतात. तर अवैध्यरीत्या मिळवलेला पैसाही सुरक्षीतपणे गुंतवला जावा असे प्रत्येकाला वाटत असते.
पण होते काय?
समाजातील उच्च शिक्षीत,सेवा निवृत्त, विशीष्ठ पेशातील, मध्यम व उच्च वर्गीय,शहरी भागातील धुरीण जास्त परताव्याच्या अपेक्षेने फारशी माहीती न घेता,एकीव माहीतीवर-सांगोपांगी अथवा एखादया ओळखीच्या मध्यस्थीमुळे नको तेथे आपली पुंजी गुंतवतात. यालाच लालचा म्हटले तर वावगे ठरणार नाही.
हेही वास्तव👇👇 आहे
यात फसण्याचे-अडकण्याचे प्रमाण निरक्षर,ग्रामीण भागातील,अल्प शिक्षीत,अल्प उत्पन्न गटातील लोकांचे तुलनेने कमी आहे.
होते काय
अमिषाला व लालचेला बळी पडणार्‍या समाज घटकांची माणसिकता हे हुशार लोक ओळखतात.तुमच्या पैशावर डल्ला मारायला फक्त Online फ्राॅड करणारे टपुन नाहीत तर समाजात पावलो पावली ही जमात आहे.ती ओळखायला शिकण्या पेक्षा
आपण अर्थसाक्षर होणे जास्त महत्वाचे नाही का?
बॅंकाचा ठेवींचा व्याजदर जर 6 ते 10% पर्यंत असेल,त्यांच्यावर तसे बंधन असेल तर आपणास कोणी 13% ते 15% व्याज देत असेल व आपण पैसा गुंतवत असाल तर चुक तुमचीच ना?
सोन्याचा भाव जर 59 हजार रु.तोळा सुरु आहे अन तुम्हाला कोणी 55 हजाराने जरी दिले तरी ते घ्यावे का?
हे समाजण्या इतपत आपण समंजस आहोत ना?
जागेचा भाव जर तुमच्या भागात 15 लाख गुंठ्ठा आहे,अन आपणास कोणी 12 लाख रु.गुठ्ठ्याने Advance पैसे घेवुन देत असेल तर घ्यावा का?
हे कळण्या इतपत आपण साक्षर आहोत का?
हे उदाहारणे दयायचे कारण असे की,समाजातील हुश्शार,अभ्यासु,तंज्ञ लोकच जर लालचीला बळी पडत असतील तर ते अर्थसाक्षर आहेत का?
अर्थसाक्षरतेचा साधा अर्थ
आपण कमावलेला पैसा मागता क्षणी,योग्य परताव्याने परत उपलब्ध होताना कुठलीही शंका-बाधा येणार नाही याचा अंदाज-अभ्यास करुन स्वतःच्या बुध्दीने गुंतवणुक कुठे करावी हे ज्याला कळते तो अर्थसाक्षर!
स्नेही हो,आजच जागे व्हा..गुंतवणुक करताना सजग-चौकस व्हा.
आपण गुंतवलेला पैसा परत कुठे गुंतवला जातो,त्याचा संबधीतानां किती परतावा मिळतो,ते गुंतवणुक कायदेशीर मार्गाने योग्य तेथे करतात का? हे ही पहाणे आवश्यक आहे. असे पाहात असाल तर आपण अर्थसाक्षर!
शेअर्स-विवीध फंड -प्लाॅट घेतानाही अभ्यास करा.तंज्ञ गुंतवणुक सल्लागारांचे मार्गदर्शन घ्या पण गुंतवणुक स्वतःच्याच अभ्यासाने करा.सल्लागार हा फक्त सल्लागार असावा.
आपण मोठ्या कष्ठाने कमावलेला पैसा गुंतवताना सजग व्हा!
अमिषाला,लालचेला,लोभाला बळी पडण्या पुर्वीच सावध व्हा!
या दिपावली पासुन अर्थसाक्षर होण्याचा संकल्प करु या!

वासुदेव काळे
श्रीरामपूर-मो.नं.9822837025
सहकार सल्लागार व व्याख्याता
अध्यक्ष-सहकार भारती,अहमदनगर(उ) जिल्हा
संचालक-महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन,मुंबई
कुटुंब प्रमुख-श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवार,श्रीरामपूर

error: Content is protected !!