संत नागेबाबा

सहकार विश्व

कॅन्सर जागृती

पतसंस्थानों – कॅन्सर बाबत आपणही खारीचा वाटा उचलु या!
सहकारी मित्रांनो,
आपली चळवळ सुद्रुढ व्हावी यासाठी आपण सर्वच जण नेहमी प्रयत्न करत असतो.सहकाराचा मुळ गाभा सामान्यातील सामान्य घटकांना एकत्र करुन त्यांना मदत करणे हा आहे.
आपल्या सभासदांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी आपला प्रयत्न चालु असतानाच आता सभासदांचे शारिरीक आरोग्य ही सुद्रुढ व सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सध्या जागतिक पातळीवर देखील कॅन्सर ही मोठी समस्या म्हणुन समाजा समोर उभी आहे.आपल्या देशात व राज्यातही कॅन्सर रुग्णांची संख्या भयावह पध्दतीने वाढत आहे.दुर्दैवाने महाराष्ट्र रुग्ण संख्येत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.त्यातही महिलांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
कॅन्सर वरील उपचार पध्दती ही दिर्घ कालीन व खर्चीक आहे.यात सर्वात महत्वाचे म्हणजे संपुर्ण कुटुंबच या चक्रात अडकते.
मानसिक, शारीरिक व आर्थीक आधार अशा वेळी त्या कुटुंबाला खुप गरजेचा असतो.
आपण आपल्या सभासदांसाठी
आरोग्य कर्ज योजना
राबवणे आवश्यक झाले असुन तात्काळ व सुलभ रीतीने कॅन्सरसाठी कर्ज देता येतील का?
यावर विचार करणे गरजेचे झाले आहे.
सामाजिक जाणिव व जबाबदारी बरोबरच याचा व्याजदर ही कमी कसा देता येईल याचाही विचार करावा लागेल.
गेल्या काही वर्षात अधुनिक उपचार पध्दती,नवनविन तंत्रज्ञान,यावर होणारे संशोधन,स्वतंत्र उभी राहिलेली कॅन्सर हाॅस्पीटल,बरोबरीनेच होमिओपॅथी व आयुर्वैदातही उपलब्ध असलेली उपचार पध्दती यामुळे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळत असला तरी हे सर्व कुशल डाॅक्टर मोठ्या शहरातच उपलब्ध आहेत.त्यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांना यासाठीची उपचार पध्दती थोडीशी महाग पडते.
आपणही पुढाकार घेवुन यासाठी ग्रामीण भागात शासन मान्य सहकारी तत्वा वरील हाॅस्पीटल उभारता येतात,याचा अभ्यास करावा.
सरकारच्या विवीध आर्थीक साहाय्य योजना,वेगवेगळ्या संस्था,ट्रस्ट,NGO या माध्यमातुन मदत उपलब्ध आहे.
तरीही मोठा आर्थीक भार कुटुंबावर पडतो.यासाठी आपण आता पुढाकार घेवुन आपल्या सभासंदाना आधार दयायला हवा.आर्थिक मदती बरोबरच समुपदेशन,योग्य मार्गदर्शन व उपचाराला योग्य दिशा मिळवुन देण्यात आपण यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.
यात खारीचा वाटा म्हणुन
श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवार,श्रीरामपूरने या क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणार्‍या कॅन्सर-समिक्षा या संस्थे बरोबर २६ जाने २२ पासुन काम सुरु केले आहे. आपण अशा आपआपल्या भागातील सामाजीक,आरोग्य विषयक संस्थांना सोबत घेवुन,बरोबरीने
कॅन्सर थांबऊ या
हा उपक्रम राबवावा.
आपल्या परिसरात कॅन्सर जागृती बरोबरच कॅन्सर झाल्यास अशा रुग्णासाठी आपले योगदान दयावे असे वाटते.

आ.वासुदेव काळे,कुटुंब प्रमुख,
श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवार,श्रीरामपूर
दि.16 डिसेंबर 22
मो.नं. ९८२२८३७०२५

error: Content is protected !!