महिला पतसंस्था नियोजनात अग्रेसर
कुटुंबाचे आर्थिक संतुलन आम्ही महिला कुठलेही ट्रेनिंग न घेता संभाळत असतो.त्याच महिला जर आर्थिक क्षेत्रात उतरुन सामाजिक जाणीवेतुन काम करायला लागल्या तर तेथेही ठसा उमटवतात.
आज महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त महिला पतसंस्था विवीध भागात कर्यरत आहेत.संपुर्ण महिलांचे संचालक मंडळ व सर्व स्टाॅफही महिलाच असणार्याही बहुसंख्य पतसंस्था आहेत.
कामकाजात पारदर्शकपणा,सर्व संचालक मंडळाला सोबत घेवुन काम करण्याचा प्रयत्न,पैशाचे काटेकोर व्यवस्थापन या आमच्या जमेच्या बाजु आहेत. काम करत असताना महिलांना अजुनही खुप संधी असुन शासनाची धोरणेंही महिलासाठी पोषक आहेत.तरी ही कामात सुसुत्रता आणण्यासाठी काही सुचना कराव्या असे वाटते.
अध्यक्ष व संचालक मंडळाने वेळ देणे गरजेचे
महिला पतसंस्था मधिल अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी ठरवुन संस्थेला वेळ दयायला हवा,प्रत्येक बाबतीत लक्ष घालुन स्वतः अभ्यास करणे आवश्यक असते. वेळोवेळी अंजिठा व प्रोसिडींग बुक नजरे खाली घालुन त्यात केलेले ठराव वाचायला हवेत.दर वर्षी होणारे आॅडिट व आलेला आॅडिट रिपोर्ट सजगपणे वाचणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण
संस्था पातळीवर स्वतःच्या संस्थेत सर्व कर्मचारी व संचालक यांचेसाठी किमान वर्षातुन दोनवेळा आपल्या गरजेनुसार प्रशिक्षण आयोजीत करायला हवे.
तसेच विवीध ठिकाणी,विवीध प्रशिक्षण संस्था मार्फत होणार्या प्रशिक्षण वर्गातही किमान दोन वेळा सहभागी व्हावे,यामुळे आपल्या क्षेत्रात होणारे बदल,नियम,कायदे याची माहिती मिळवता येते.
विवीध संस्थांना भेटी
आपल्या संस्थेच्या साईजपेक्षा किमान दुप्पट साईज असणार्या महिला संस्था अथवा इतर पतसंस्थानां वर्षातुन एकदा भेटी देण्यासाठी अभ्यास दौर्याचे आयोजन करावे,त्यामुळे त्या कामकाज कशा करतात व आपल्या संस्थेत काय बदल करु शकु या बाबत प्रत्यक्ष पहाता येते.
कर्ज धोरण
आपल्या संस्थेचे भौगोलिक परिस्थीती नुसार कर्ज धोरण आपण तयार करायला हवे. कर्ज देण्या पुर्वी कर्जदाराच्या घरी व्हिजीट करावी व लेखी व्हिजीट रिपोर्ट आल्यावर कर्जदार व जामिनदारा याच्या एकत्रित मुलाखती घेवुनच वाटप करावे.छोटी कर्ज नफा वाढवतात व धोका कमी करतात ही गोष्ट लक्षात ठेवली तर धोरण निश्चीत सोपी होते.
ठेव धोरण
ठेवीदार आपल्याकडे पैसे ठेवायला येतात म्हणुन घ्यायचे का? याचाही विचार महिला संचालक मंडळाने गांभिर्याने करायला हवा.आपल्याकडे सक्षम व फेडीची क्षमता असणारा कर्जदार असेल तरच ठेववृध्दी करावी.आपल्या मागिल आर्थिक वर्षातील ठेवींच्या 1% रक्कमच एका ठेवीदाराची स्विकारावी असे मला सुचवावे वाटते.यापेक्षा जास्त रक्कम स्विकारल्यास नंतर घावपळ करावी लागते.
वसुली धोरण
वसुली हा पतसंस्था चळवळीचा आत्मा आहे असे मला वाटते.यासाठी संचालक मंडळाची त्रिसदसिय कमिटी असावी.दर 15 दिवसाला कर्मचारी व या समितीने एकत्रीत मिटींग घेवुन वसुलीवर लक्ष ठेवुन नियोजन करावे.वेळ प्रसंगी स्वतः संचालकांनीही वसुलीसाठी कर्जदार,जामिनदार यांच्या घरी जावे,त्यामुळे थकबाकीदारांवर दबाब वाढतो.
महिला कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात अग्रेसर असल्यामुळे पतसंस्थेतही काटकसरणीने वागतात,अनावश्यक खर्चावर लगाम आणतात,पैशाचे मुल्य त्या पुरुषांपेक्षा जास्त जाणतात असे म्हटले तर वावगे ठरु नये.
महिला दिनासाठी व मार्चसाठी सर्व महिला पतसंस्था मधिल अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक व कर्मचारी यांना शुभेच्छा!
सौ.विदया वासुदेव काळे
अध्यक्षा-श्री महालक्ष्मी महिला पतसंस्था,बेलापूर
मो.नं.-9623079845