आता नात्यानांही रिचार्ज करु या!
स्नेही हो🙏
खर तर या विषयावर मी गेले कित्येक दिवस निरीक्षण करतोय,बारकाईने आजु बाजुला पहातोय
लेख प्रपंच सुरु करण्यापुर्वी मी ही ५० शी ओलांडली आहे..४ पिढ्यांचा साक्षीदारही आहे( आमचे आजी/आजोबा_आई/वडील_आम्ही व पुढची) म्हणुन लीहीतोय… आजोबाच्या काळात चुलत,मामे,आत्ये,मावस अस काही दिसत नव्हत तर सर्व भाऊ बहीणच असावेत..कारण ते सांगताना असच सांगत होते..मावश्या,आत्या, महीना महीना आनंदाने मोठ्या अशा या कुटुंबात वावरायच्या! तेव्हा काका,काकु एकत्रच असायची,घरात १०/१५ लोक आनंदाने व समजुतीने राहायची…आजी आजोबांचा तोरा न धाकही असायचा पण तो एकत्रीत ठेवणारा! ती पिढी संपुन पुढे आमचे
आई/वडीलांचा काळ आला
माणस नविन व्यवसाय,कामधंदा शोधु लागली अन घरा पासुन थोडी थोडी दुरावयला लागली पण तरीही मावश्या ,आत्यांचा हक्काचा वावर अबाधित होता,त्यांच्या घरीही आमचे जाणे व त्यांच्या मुलांचे येणे हे कित्येक दिवसांचे असायचे!मामा..मामी/काका..काकु ही घर विश्रांतीची,हवे ते हट्ट पुरुवुन घेण्याची होती..लांबचे,जवळचे,सख्ये,चुलत या लक्ष्मणरेषा आखल्या गेलेल्या नव्हत्या….मुलीबाळी,जावाई हे सर्वांचे होते,…धोंड्याच्या महिन्यात तर हे पंगतीच्या पंगती जेवणावळ होत होती तेव्हा कळायचे!देणंघेणं,रागलोभ फारसे नाही दिसायचे!त्यांना होणारा त्रास,त्यांची अडचण,त्यांची दुखणी ही सर्व परिवाराची होती…लग्नकार्य तर सर्वांचीच होती.तेव्हा तुटपुंज्या कमाईतही अर्थव्यवस्था डळमळत नव्हती अन अडीअडचणीनां सर्व तन,मन,धना ने उभीही राहात होती. नंतर आमची
पिढीचा काळ..
आला अन चक्र जणु उलटी फिरु लागली..आई वडीलांचा धाक अन त्यांचा आदरही हातच राखुन होवु लागला.कामाचा व्याप वाढला,शिक्षण व्यवस्था इंग्रजीकडे झुकु लागली,अन जणु नाते हे शोभेचे होवु लागले,जाणे,येणे कमी झाले,सख्ये_चुलत,आत्ये_मावस_मामे हे नाते संबंध अधोरेखीत होवु लागले.लग्न संमारंभ दिमाखदार,हौशीमौजींची रेलचेल,मोठे मोठे कार्यालय अन लाॅनही कमी पडु लागले,या गडबडीत लग्नघरात ८/१० माणसेच दिसु लागली,वर उल्लेख केलेली आपली नाती
फक्त पत्रीकेत अन मीरवण्यापुरती भासु लागली….पै..पैसा मुबलक आला,सोबत तशी दुखणीही घेवुन आला,मोठे मोठे दुखणे..हाॅस्पीटल मध्ये जाताना मग आम्ही आपली माणस शोधु लागलो.अशा वेळी चुलत-निलत/आत्ये-मामे-मावस लांबच पण सख्येही दुरावुन बसलो हे पहावु लागलो. हा काळ का अन कसा आला याचे आत्मपरीक्षण करण्या एवजी परिक्षणच करु लागलो.आई-वडील/बहीण-भाऊ/काका-आत्या/मामा-मावशी ही नातीही गमावण्याच्या टप्प्यावर आली. स्नेही हो आता आपली पुढच्या पिढीचा काळ
आलाय..ती तर हा टप्पाही ओलंडतील असे वाटायला लागलय..व्हाॅटसअॅप,फेसबुक,इन्टा,टिटर,VC ही यांची संर्पकाची व्याख्या आहे.लाॅकडाऊन ने तर या पिढीच्या मनात गुदगुल्याच केल्यात..ना लग्न समारंभ ना दुखःद घटनेत उपस्थीत राहाण्याची जबाबदारी! अगदी स्वतःच्या ही लग्नात १०/२० लोकांची उपस्थीती!
पण जनहो कोरोना ज्यांच्या जवळ -विवीध गंभीर आजार-कौंटुबीक दुखःद आघात ज्यांनी अनुभले त्यानां विचारा नात्यांचे मोल!
माणस एकमेकानां भेटण्यासाठी,घरातल्यानांही पहाण्यासाठी धायमोकळत होती,एकटंपणाने दचकुणच जगाचा निरोप घेत होती,ते १५ दिवस व नंतरचे होमक्वाॅरंटाईनचे दिवसात ५/१० किलोने वजण कमी होवुन येत होती..आहे ते नातेवाईकही इच्छा असुनही भेटु शकत नव्हते
.कोरोनाने माणुसकी जागवलीय,एकमेकानां जवळ आणलय असा समज होता
.पण पण……
आता तरी आपण व आपल्या परिवारातील पुढच्या पिढीला सावध करु या! पैसा आवश्यकच पण माणंसाशीवाय पैसा निरर्थकच,नातेसंबध जपु या, जाणे,येणे वाढवु या!ज्या नातेवाईकांनी कधी काळी आपल्यासाठी कष्ट घेतलेत,आपल्यासाठी बहूमुल्य वेळ,पैसा खर्च केलाय त्यांचे उतराई होवु,त्यानां त्यांच्या परिवाराला धन्यवाद देवु!!
पुढेही हे नातेसंबध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आपण स्वतः करु असा संकल्प करु या! जन्मा बरोबर व लग्ना नंतर जोडलेली दोनही नाते बहुमुल्य आहेत हे आपल्यासाठी अधोरेखीत करुन या पिढीला परत एकदा मागे वळुन पहाण्याची द्रुष्टी देण्याची आपली जबाबदारी आहे. नात्यानां व्हॅलिडीटी नसते हे सिध्द करु या! अशी नोंद इतिहासात करण्याचा संकल्प करु या!!
वासुदेव काळे,
श्रीरामपूर-मो.-९८२२८३७०२५
दि.24 जून 23