गुंतवणुक करतानाच जास्त सजग झालो तर
मान्यवर सहकारातील सहकारी
आपणाकडे म्हणजेच पतसंस्थामध्ये गुंतवणुक करताना ठेवीदार आपला किती अभ्यास करतो,किती चिकीत्सक असतो.मग आपणही आपल्या विश्वासावर समाजाने ठेवलेला पैसा गुंतवताना किती विचार व अभ्यास करायला हवा.
गेले कित्येक वर्षे हे सुरु आहे,दर सहामहीन्याने एखादी बॅंक अडचणीत येते,आपल्यातील सहकारी पतसंस्थाच्या मोठ्या रक्कमा अडकता,आपण हवालदिल होवुन बॅंका,सरकार,RBI अगदी सहकार खाते यांची दारे ठोठावतो,आपल्या विवीध फेडरेशन आपले धुरीण नेतृत्व यात आपल्यासाठी सर्व प्रयत्न करतात पण—
रक्कमा किती परत मिळतात,कधी मिळतात हा संशोधनाचा व अभ्यासाचा मुद्दा आहे.त्यामुळे आपण किती अडचणीत येतो,किती तरी संस्थाच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होतो.
हे वारंवार घडत आहे,कधी PMC कधी मल्लकापूर कधी नगर अर्बन,कधी कुठली जिल्हा बॅंक त्यांच्या चुकीमुळे अडचणीत येतात अन फळ आपण भोगतो.
हे थांबणार कसे
*आपण गुंतवणुक करताना जर आपल्या आसपास च्या बॅंकेत गुतुंवणुक केली तर ?
* अल्पमुदतीला प्राधान्य दीले तर ?
* एकत्रीत येवुन गुंतवणुक सल्लागार घेतले तर ?
* अल्प मुदतीसाठी काही पर्याय अभ्यासले तर?
*सर्वात महत्वाचे सहकारातील राज्यात नेतृत्व करणार्या मान्यवरांनी पुढाकार घेवुन आपलीच राज्य पातळीवर एखादी बॅंक सुरु केली अथवा हस्तांतरीत करता आली तर?
असे एक ना अनेक पर्याय समोर येतात.
पैसे अडकल्या नंतर परत मिळवणे फार त्रासदायक असते.ताळेबंदावर मोठा परीणाम करणारे असते.आधीच अडचणीत आल्यावर परत तरतुद करणे म्हणजे एक गंभीर आजारावर उपचार सुरु असतानाच दुसर्या गंभीर आजाराचे निदान होण्यासारखेच आहे ना?
यासाठी आता आपण सर्वांनीच विचार करायला हवा,आपले सहकारातील मार्गदर्शक,नेते,फेडरेशन यांनीही
गुंतवणुक कुठे व कशी करावी
यावर वारंवार चर्चोसत्र घेवुन दिशा दाखवायला हवी.
महत्वाचे म्हणजे यावर विशेष लक्ष देवुन एकमेकांनी सहकार्यानां सजग करायला हवे.
आपले करोडो रुपये अडकुन पडलेले आहेत,अन आपल्यालाच तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करावा लागतोय.सहकार खाते,लेखा परिक्षक,ठेवीदार असे एक ना अनेक जण यावेळी खिंडीत गाठतात हा अनुभव बर्याच जणांनी घेतला आहे व घेत ही आहेत.
आता आपल्याला सजग होवुनच काम करावे लागेल.
आ.वासुदेव काळे,संचालक- महाराष्ट्र स्टेट को-ऑप डेव्हलपमेंट & वेलफेअर असोसिएशन
अध्यक्ष-श्री सिध्दीविनायक पतसंस्था,श्रीरामपूर
दि.१२/१०/२२
मोबा.नं. 9822837025