संत नागेबाबा

सहकार विश्व

Profitability (उत्पन्न क्षमता )

Profitability (उत्पन्न क्षमता )

संस्था मुळात नफा मिळवण्या करिताच चालवली पाहिजे.
नफा आवश्यक का?
1)वैधानिक तरतुदी जसे राखीव निधी/बुडीत कर्ज निधी इ.

2)सभासदांना लाभांश देणे आवश्यक

3)कर्मचारी यांना पगारा व्यतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन देणे आवश्यक

4)सरकारला कर रूपाने परतफेड आवश्यक

5)सामाजिक सहभाग आवश्यक

नफा म्हणजे:-” संस्थेला विविध मार्गांनी मिळालेल्या उत्पन्नातून सर्व प्रकारचा खर्च वजावट करता शिल्लक राहिलेली रक्कम होय ”

नफा व नफाक्षमता यात फरक असुन नफा मिळवणे त्यातुलनेत सोपे आहे पण नफाक्षमता वाढवणे कठीण आहे.

नफाक्षमता वाढवण्यास खालील मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहेत.
1)व्यवसाय वृद्धी चा पाठपुरावा

2)ताळेबंदाची कार्यक्षमता वाढवणे

3)अनुपालन प्रबंधन मजबुतीकरण करणे

4)डेटा व विश्लेषण प्रबंधन

5)अधुनिक भुगतान पध्दत स्वीकारणे

6)विलय व अधिग्रहण स्वीकारणे

लाभताक्षमता वाढी करिता वरील मुद्द्यांसह ताळेबंदतील
जास्त किंमतीचे निधी /किंमत नसलेले निधी/कमि किंमत असलेले निधी यांची सांगड ही उत्पन्न नसलेले निधी /कमि उत्पन्न असलेले निधी /जास्त उत्पन्न असलेले निधी यांचे सोबत अत्यंत व्यवसायिक दृष्टिकोन विचारात घेऊन नियोजन करण्यात यावे.

नफातोटा पत्रकाचे व्यवस्थापन करतांना संस्थेचा स्प्रेड कसा वाढवता येईल तसेच बर्डन कसे कमि करता येईल याकरिता प्रभावी नियोजन करून यशस्वी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

लाभताक्षमते वर ठेव व कर्ज व्याजदराचे बदलणारे दर प्रभाव करत असल्याने संवेदनशील देयता व संवेदनशील मालमत्ता यांची सुयोग्य विभागणी करून संस्थेच्या ALM नुसार त्याची आकारणी असावी.

खर्चात कपात करण्याच्या हेतुने तसेच संस्थेच्या कर्मचारी वर्गाचा अधिक वेळ व श्रम हे संस्थेच्या प्रमुख ध्येया करिता जास्तीत जास्त वापरले जाण्या करिता आवश्यक तेथे B.P.O (business process outsourcing)पध्दत स्विकारली जावी.
(नितीन वाणी,पुणे)

error: Content is protected !!