आत्मशिस्तपालन-नैतिकता – व्यवस्थापन
आत्मशिस्त
या बाबतीत शासंकता आहे.यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या.
वेळ पाळणे,कामावर आल्या पासुन ते सुटी पर्यंत पुर्णवेळ संस्थेत थांबणे,कुठल्याही कारणाने बाहेर न जाणे,शातंपणे काम करणे,आवाजाची पातळी खाली ठेवणे,ग्राहकांचा विश्वास जपणे.
*आपल्या कुठल्याही व्यवहारामुळे/कृतीमुळे संस्थेचे 1 (एक)रुपयांचेही नुकसान होणार नाही,याची जाण असावी,आपल्यावर व्यवस्थापनाचा असलेला विश्वास सार्थ करणे महत्वाचे! न की,त्याचा गैरफायदा घेणे.
* आपल्या संर्दभातील व्यवहारात स्वतःच्या फायदयासाठी संस्थेचे नुकसान तर आपण करत नाही ना? हे तपासत जा.
एका सहकार्याने केलेली एक चुक याची शिक्षा सर्वांनाच होत असते
यासाठी शाखाधिकारी यांनी स्वतः चुक तर करु नयेच पण कुठल्याही सहकार्याला-चुकांसाठी-फायदयासाठी पाठीशी घालु नये तो आत्मघात ठरत असतो.
*आपल्याला आपल्या श्रमाचा,कामचा,ज्ञानाचा,बुध्दीमत्तेचा योगय मोबदला संस्था देत असते.
आपणास या पेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा असेल,तर संस्था बदला पण चुकीचा मार्ग निवडु नका
*आपल्या कामाच्या वेळा निश्चीत आहेत,त्यामुळे कामाला प्राधान्य दया.
*व्यक्तीगत कामासाठी कामाच्या वेळेत बाहेर जाणे होत असेल तर हालचाल रजिस्टर मध्ये जाताना स्टाॅफने स्वतः व आल्यावर शाखाधिकारी यांनी नोंद करत जा!
बाहेर जाणे गरजेचे असेल तर त्या स्टाॅफने शाखाधिकारी यांची परवानगी घेवुन एकट्यानेच जावे,संस्थेत इतर कुठला सहकारी बरोबर असणार नाही.
*सकाळी 9 ते 4 कुठल्याही स्टाॅफने आपले टेबल 10 मी.पेक्षा जास्त सोडु नये.
*आपल्याकडे आलेला ग्राहक समाधानी होवुन गेला पाहिजे याची जान अन भान प्रत्येकाला असायला हवे.आलेल्या ग्राहकाचे हसतमुखपणे स्वागत करा,त्याचे काम काय आहे,कुणाला भेटायचे आहे हे विचारुन त्याला त्यासाठी मार्गदर्शन करण्याची आपली जबाबदारी असते.
*ग्राहकां समोर हसी – मजाक करणे,आपल्या सहकार्यांशी बोलण्यात,चेष्टा करण्यात,वाद घालण्यात ,फोनवर बोलण्यात मग्न राहाणे हे बेजबाबदारपणाचे ठरेल.
आपल्यातील कुणालाही कुठलेही(अगदी सातत्याने मोबाईल वापराचे) व्यसन असेल तर ते लगेच सोडा.स्वतःत बदल करा.व्यसन असणारी सहकारी लगेचच व्यवस्थापनाच्या निर्दशनास आणा.त्यानां पाठीशी घालु नका
*आपल्या संस्थेत पुरुषां इतकीच महिलांची संख्या आहे.त्यामुळे सबंधात योग्य अंतर दोघांनीही ठेवायला हवे.
*.सकाळी 9 ते सायंकाळी 9 (सुट्टी वगळुन..) या वेळातच एकमेकांच्या संर्पकात रहा,इतर वेळी फोन करणे,SMS करणे 100% टाळा.हे न पाळल्यास,काही प्रश्न निर्माण झाले तर संस्था कधीही तुमच्या सोबत नसेल.तो तुमच्या व्यक्तीगत चुकीचा परिणाम असेल याचे भान ठेवा.
संस्थेचे महिला व पुरुष दोनही ग्राहक आहेत,ते व्यवहारा मुळे..संस्थेमुळे तुमच्या संर्पकात आले आहेत.त्यांच्याशी व्यक्तीगत जवळीक साधन्याचा प्रयत्न करु नका.संस्थेच्या वेळेत व संस्थेच्या कामा शिवाय फोन/ SMS करु नका
*आपण सर्वचजण समजदार व कुटुंबात राहातो,याचे भान ठेवा.
रात्री 12 वा.ही संस्थेतील स्री-पुरुष सहकारी एकमेकांच्या गाडीवर/घरी सोडण्यास गेले तरी तुमचे अभिनंदन व्हायला हवे असे नाते तयार करा
*कामाच्या वेळात हेड फोन वापरणे 100% बंद करा.फार गरज असेल तर ब्ल्युट्युट वापरा.
*स्वतःला शिस्त लावा,इतरानां बदलण्याचा प्रयत्न नंतर करा.संस्थेने/मॅनेजमेंटने ठरवुन दिलेल्या साच्यातच काम करा.
आत्मशिस्त व नैतीकता याचा अवलंब प्रत्येकाने आचरणात आणावा
व्यवस्थापन
प्रत्येक शाखेत शाखाधिकारी हे प्रत्येक व्यवहारासाठी अंतीम जबाबदार असतात.त्यामुळे कामकाज करताना त्यांचा निर्णय अंतीम असतो.शिस्तपालन,आदेशाचे पालन,जबाबदारीची जाणीव यासाठी त्यानां सहकार्य करुन आपल्या शाखेचे काम समृध्द होते.
* प्रत्येक कर्मचारी यांनी दुसरा सहकारी स्पर्धक न समजता सहकारी समजला तर 1+1 =2 न होता 11 होणे आवश्यक आहे,त्यामुळे ताकद कित्येकपटीने वाढते.
* शाखाधिकारी हे संस्थेचे हीतच पहात असतात,त्यामुळे टिम म्हणुन सोबत रहा.तसेच शाखाधीकारी यांनी पुर्णवेळ शाखेतच राहाण्याचा प्रयत्न करा.
* आपल्याला दिलेल्या टेबलचा पुर्ण अभ्यास करुन,न्याय दया.
* शाखाधिकारीही माणुसच आहेत,आपल्यातीलच आहेत,त्यामुळे तेही चुकु शकतात हे ही लक्षात घेवुन अडचणीच्या वेळेत त्यांना साथ दया,तर शाखाधिकारी यांचीही प्रत्येक कर्मचार्याच्या पाठीशी राहाण्याची जबाबदारी आहे.
* व्यवस्थापनाचा पहिला नियम असा आहे की,प्रत्येक व्यवहार..प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट टाॅपर अधिकारी यांना माहीत असावी,नव्हे त्यांनी त्यात स्वतः लक्ष घालायला हवे.
* प्रत्येक स्टाॅफने दुसर्या सहकार्याला वयानुसार,जबाबदारी नुसार,पदानुसार योग्य सन्मान देण्याचे भान ठेवायलाच हवे.व दुसर्याने सन्मान मिळवण्यास पात्र असायला हवे.
* शाखेतील स्टाॅफने व्यवसाय वाढीवर(ठेवी,कर्जै,विवीध योजना) भर देण्यासाठी एकत्रीत काम करताना आपल्या टेबलला..जबाबदारीला 100% न्याय दयावा,इतर सहकार्यांचे परिक्षण शाखाधिकारी,DCEO ,CEO करतील.
संस्था मोठी झाली,नावारुपाला आली तर तुम्हीही मोठे होणार आहात.
वासुदेव काळे,
दि.06/04/24