संत नागेबाबा

सहकार विश्व

!!नागेबाबा मल्टिस्टेटच्या सभासदाला नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत 4,75,000 रुपयांचा धनादेश प्रदान!!

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या मार्गदर्शनातून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट राहता शाखेचे सभासद श्री. गणपत गहिनीनाथ शेळके यांचा मागील काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.सदरील खातेदार यांचे या अपघातामध्ये खूप जास्त प्रमाणात शारीरिक व आर्थिक नुकसान झाले आहे यांना अजूनही त्यांच्या पायावर उभे राहता येत नाही. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. आज त्यांना सुरक्षा कवच योजनेअंतर्गत 4,75,000/- रुपये रकमेचा धनादेश नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीने खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

error: Content is protected !!