संत नागेबाबा

सहकार विश्व

वारसदाराना दहा लाखांचा अपघाती विमा

आपल्या नागेबाबा मल्टीस्टेट वैजापूर शाखेचे कर्मचारी कै. शिवानंद भाऊसाहेब निंबाळकर ( सिरसगाव, ता वैजापूर ) यांचे मागील वर्षी अपघातामध्ये निधन झाले. नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक आदरणीय चेअरमन साहेब श्री कडूभाऊ काळे यांच्या* संकल्पनेतून -नागेबाबा सुरक्षा कवच योजना सभासदांसाठी संस्थेमार्फत चालू करण्यात आलेली होती. या सामाजिक उपक्रमांतर्गत दहा लाखांचा अपघाती विमा वारसदारांना देण्यात येतो व पाच लाखापर्यंत अपघाती हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. कै. शिवानंद *भाऊसाहेब निंबाळकर यांच्या कुटुंबीयांना या सामाजिक उपक्रमा अंतर्गत 10,00,000/- रुपये विमा देण्यात आला. त्यांच्या मागे दोन वर्षाचा मुलगा, पत्नी व आई-वडील असे कुटुंब आहे. /*यावेळी वैजापूर शाखेचे सन्माननीय सभासद प्रभाकर मते, शरद पवार साहेब, रामेश्वर नेहे तसेच गावातील प्रतष्ठित सभासद व नागरिक उपस्थित होते, *नागेबाबा परिवाराच्या वतीने श्री क्षेत्र *भेंडा येथील नागेबाबा परिवारातील सदस्य आदरणीय संजय तात्या नवले अजितदादा रसाळ, आबासाहेब काळे, राजेंद्र चिंधे, सुभाष चौधरी, अवधूत लोहकरे, सुनील गव्हाणे आदी सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!