संत नागेबाबा

सहकार विश्व

कर्मचारी पगारवाढ

पतसंस्था-कर्मचारी पगारवाढ कशी होईल

कुठलीही पतसंस्था आपल्या कर्मचार्‍यानां कुटुंबा प्रमाणे संभाळत असते.त्यांच्यावर पैलु पाडुन त्यांना चमकवते,घडवते. त्यांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा भागवणे हि ही जबाबदारी संस्थेचीच!
त्याचवेळी कर्मचार्‍यांनीही संस्था आपली मानली पाहिजे,तिच आपली अन्नदाता आहे,याचेही भान ठेवायला पाहिजे.संस्था नफ्यात असेल तर आपलेच पगार वाढणार! संस्था नावाजली तर आपलेच वलय वाढणार हेही त्यांनी विसरुन कसे चालेल.
पगारवाढ व भत्ते देताना मॅनेजमेंट प्रत्येक कर्मचार्‍याचा,त्याच्या योगदानाचा विचार करत असते.पण प्रत्येक कर्मचारी आपल्या पगारवाढीची,भत्यांची तुलना दुसर्‍याशी करतो पण…पण…
दुसरा कर्मचारी घेत असलेली जबाबदारी,करत असलेले पडेल ते काम,देत आसलेला वेळ,संस्थेसाठी झीजण्याची तयारी,त्याची संस्था मोठी करण्याची मानसिकता याचा कधी विचार करत नाही,तो केला तर पगारवाढ होताना पडलेल्या फरकाचेही उत्तर स्वतःलाच मिळते!यालाच आत्मपरीक्षणही म्हणतात!!
संस्था प्रत्येकाचा कमी-अधिक पगार वाढवते त्यावेळी आपला वाढलेला पगार हा खरच योग्य आहे का? आपण तेवढे काम करतो का? माझ्यावर होणार्‍या वार्षिक खर्चाच्या कमीत कमी 10 पट नफा मी मिळवुन देतो का? हे पहावे.अन हे असेल तर पगारवाढ मागण्याचा अधिकार असावा असे माझे मत आहे.
किमान या वर्षापासुन आपण ठरवा,अभ्यास करा.
संस्था आपल्यावर वार्षिक किती खर्च करते,याचा हिशोब स्वतःच काढा,त्यानंतर आपण संस्थेचा किती फायदा करुन देतो,आपल्यामुळे संस्थेला किती खरोखरच नफा झाला याचा अभ्यास करा.तो नफा आपल्यावर होणार्‍या खर्चाच्या कमीतकमी 10 पट आहे का? हे पहा.
असेल तर आपण संस्थेची असेट आहात,नाहीतर लॅबलीटी व्हाल! जो कर्मचारी संस्थेशी 100% एकनिष्ठ आहे,म्हणजेच फक्त तो संस्थेवरच अवलंबुन आहे असे कर्मचारी संस्था चालकानां हवे असतात.पण पार्ट टाईम,एकाच वेळी 2/3 ठिकाणी काम करुन उत्पन्नाचा स्त्रोत शोधणारे असतील तर ते कसा न्याय देणार संस्थेला? अन त्यांचीही अपेक्षा पूर्ती कशी होणार?
माझे नेहमी संस्था चालकानां सांगणे असते,प्रत्येक कर्मचार्‍याचे कुटुंब चालेल,त्याच्या गरजा भागतील एवढे उत्पन्न त्याला संस्थेतुन मिळायलाच हवे! तरच तो एकनिष्ठ राहील.
आरोग्य विमा, जीवन विमा,अपघात विमा,PF या सुविधा प्राधान्याने आपल्या सहकारी कर्मचार्‍यानां दयायला हव्यात..मग त्यांचेकडुन नफा वाढीची,उत्पन्न वाढीची व व्यवसाय वाढीची अपेक्षा ठेवा नव्हे टारगेटच दया!! बघा रिर्झल्ट काय मिळतो ते!!
पतसंस्था चळवळीत आपण व्यवसायिकता आणायलाच हवी .यासाठी हुशार,अभ्यासु कर्मचारीच संस्थाना हवे असतात.झोकुन देणारे अभ्यासु कर्मचारी मिळणे हेही संस्थेसाठी महत्वाचे असते.आता काळ बदलला आहे,बदललेल्या काळानुसार सर्वांनाच वागावे लागेल.तरच ही चळवळ पुढे जाईल.लाखों कर्मचारी या चळवळीत आहेत,त्यांना अपडेट व अपग्रेड वारंवार प्रशिक्षणातुन करताना संस्था चालकानांही प्रशिक्षीत व्हावेच लागेल.काळ स्पर्धेचा व डिजीटल आहे.

वासुदेव काळे
संचालक-महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन,मुंबई
सहकार सल्लागार
मो.नं.9822837025
दि.12/07/23

error: Content is protected !!