सहकार मंत्रालय
नंदिनी सहकार योजना
वर पोस्ट केलेले: 07 ऑगस्ट 2024 दुपारी 4:53 पीआयबी दिल्ली
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाची (एनसीडीसी) नंदिनी सहकार योजना ही आर्थिक मदत, प्रकल्प निर्मिती, सहाय्य आणि क्षमता विकासाची एक महिला केंद्रित चौकट आहे ज्याचा उद्देश महिला सहकारी संस्थांना एनसीडीसीच्या कार्यक्षेत्रात व्यवसाय मॉडेल आधारित उपक्रमांचा अवलंब करण्यास मदत करणे आहे. महिला सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना आर्थिक मदतीवर किमान किंवा कमाल मर्यादा नाही.
पंतप्रधानांनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारताच्या तत्त्वांशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने नंदिनी सहकार योजना सुरू करण्यात आली. ही योजना म्हणजे महिलांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदतीची चौकट आहे. हे महिला सहकारी संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला समर्थन देते. यामध्ये महिलांचे उद्योग, व्यवसाय आराखडा तयार करणे, क्षमता विकास, कर्ज व सबसिडी आणि इतर योजनांच्या व्याजसवलती या महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
एनसीडीसीचा निधी प्रकल्पाधारित आहे. नंदिनी सहकार योजनेअंतर्गत बिहारमधील एकाही महिला सहकारी संस्थेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही.
तथापि, 31.03.2024 पर्यंत एनसीडीसीने देशभरातील महिलांनी विशेषतः प्रोत्साहन दिलेल्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी 6426.36 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित केले आहे.
सहकारमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
एमजी/एआर/व्हीएस/एसएस