संत नागेबाबा

सहकार विश्व

नवीन बदल..

पतसंस्था चालकानां सजग व्हावे लागेल
जग रोज नव्या बदलानां सामोरे जात आहे,प्रती मिनीट सर्वच क्षेत्रात चांगले – वाईट बदल होत असतात,जे हे स्वीकारतात ते पुढे जात आहे,तीच वेळ आता पतसंस्था चळवळीवर आली आहे.आपल्याला आता खरोखर
बदलावे लागेल
आपल्या चळवळीवर सहकार खाते,नियामक मंडळ, प्रिंट मेडिया,सोशल मेडिया लक्ष ठेवुन आहेत,लवकरच केंद्रिय सहकार खात्याची ही भर यात पडणार आहे.अशा वेळी आपण सजगपणे,दिशादर्शक व पारदर्शकपणे काम करणे गरजेचे आहे,जुनीच मानसिकता,जुनीच ध्येय धोरणे यात बदल करावा लागेल.

मार्च एन्ड
आपला 31 मार्च 2024 पार पडला आहे,काही ठिकाणी अदयापही पार पडतो आहे.समाजासमोर,सभासदांसमोर आकडेवारी सजगपणे मांडणे गरजेचे आहे.आकडेवारी मांडता इतरांशी स्पर्धा नको तर सत्यता मांडायला हवी.सहकार हा नफा कमावण्यासाठी नाही तर आपल्या सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आहे.बदलाला सामोरे जाताना आपल्या चळवळीचा गाभा काय आहे,तत्व काय आहे हेही लक्षात ठेवावेच लागेल.

नफा
चळवळीत नफा किती झाला हे मांडण्याची,घोषित करण्याची जणु स्पर्धाच सुरु झाली आहे असे वाटते.आपण देत असलेले ठेवींचे व्याजदर,कर्जाचे व्याजदर,आपल्या गुंतवणुकीचे व्याजदर,सर्व तरतुदी,संस्था चालवताना होत असलेले खर्च या सर्वांची गोळाबेरीज केली तर खेळत्या भांडवलाच्या 2% नफा मिळवणे ही सुध्दा तारेवरची कसरत असते.अन नफा क्षमता 1 ते 2 % असावी हे ही लेखापरिक्षणात,गुणपत्रिकेत उल्लेखलेले आहे.आपण लेखापरिक्षणाचे निकष वाचायले हवेत,सवंग लोकप्रियेतेसाठी,कुठे तरी कागदावर निधी वाढवण्यासाठी चुकीचा नफा दाखवणे धोकेदायक ठरेल. नफ्याचा चुकीचा फुगवटा संस्थेला अडचणीत आणु शकतो.

NPA
NPA चे निकष आपण सर्वचजण जाणता,जो पर्यंत प्रकरण थकबाकीत(5हप्ते) आहे,तो पर्यतची थकबाकी व NPA झाल्यावर संपुर्ण येणे रक्कमच थकबाकी(NPA) धरली जाते हे आपण जाणता ना?
अशावेळी कराव्या लागणार्‍या तेथुन पुढील तरतुदी यावर अभ्यास करता का?
खरतर आपला 85% कर्जदार सर्वात खालच्या स्तरातील म्हणजे
जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,तोची साधु ओळखावा….
अशी आपली गत! चांगला कर्जदार आधीच कॅच करणारे,उचलणारे बॅंकर आहेतच,मग उर्वरीत आपले!!
अशा वेळी तो कर्ज घेतानाच अडचणीत अडचणीत असतो.मासिक, नियमीत हप्ता कधी फेडणार.. आपला कर्जदार कर्ज घेतल्यावर पहिले 2/4 हप्ते रेग्युलर राहतो,पुढे थकतोच.त्याला मोठा कालावधी ,वेळ व संधी हवी असते.पण NPA निकषामुळे आपण त्रस्त!
ही परिस्थिती ग्रामिण भागात,निमशहरी भागात जास्त आहे, अन संस्थाही येथे जास्त आहेत. अशा वेळी कर्ज देतानाच कर्जदार ओळखता यायला हवा.

सक्षम वसुली यंत्रणा
खर तर थकबाकी ही वाढलेल्या वजनासारखी,वाढलेल्या चरबीसारखी आहे.वाढु पर्यंत कळत नाही,लक्षात येत नाही अन जेव्हा लक्षात येते,तेथुन पुढे सातत्यपुर्ण काम केले तरी थकबाकी कमी करण्यास खुप कालावधी लागतो.यासाठी संस्था
छोटी,मध्यम वा मोठी असो तेथे वसुली विभाग स्वतंत्रच असावा.त्या विभागातील अधिकारी प्रशिक्षीत व सकारात्मक मनोवृत्तीचे असायला हवेत.
खर तर पतसंस्थाचा प्रत्येक विषय हा स्वतंत्र लेखमालेचा होईल.
सर्वात महत्वाचे म्हणजे पतसंस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक मंडळ हे वेळ देणारे,सकारात्मक वृत्तीचे,प्रशिक्षीतअभ्यासु व सामाजीक दायित्वाचे भान असणारे हवेत. CEO/मॅनेजर यांनी वारंवार विवीध विषयांवर प्रशिक्षण घेवुन त्याच अवलंब आपल्या संस्थेत करताना आपल्या सहकार्‍यांची उर्जा व ज्ञान वाढवण्यावर भर द्यायला हवा.

वासुदेव काळे,श्रीरामपूर
मोबा.नं.9822837025
गुढिपाडवा दि.9 एप्रिल 24

error: Content is protected !!