पतसंस्था मोठया करण्या बरोबरच सक्षम करा
सहकारातील सहकारी
पतसंस्था चळवळ सामान्यांनी सामान्यासाठी सुरु केलेली व्यवस्था आहे.काळानुसार तीचे स्वरुप बदलत गेले.अनेक आघात पचवत पतसंस्था चळवळ घोडदौड करते आहे. सामान्य सभासदां बरोबरच आता टेक्नाॅलाॅजी हाही घटक महत्वपुर्ण झाला आहे.बदलणारे नियम,कायदे,परिपत्रके त्यातुन होणारे लाभ या बरोबरच येणार्या समस्यांही वाढत आहेत.
परंतु मुळ समस्या आपल्या कार्यशैलीत आहे
आपण प्रशिक्षण,शिक्षण घेण्या एवजी अनुकरणावर भर देतो. अभ्यास करण्या एवजी माहिती घेतो. सदयस्थितीत संस्थेत पुर्णवेळ/अर्धवेळ अभ्यासु संचालक व अध्यक्ष,उपाध्यक्ष असणे ही गरज झाली आहे.
आपल्या संस्था वाढवण्या बरोबरच सक्षम करणे आवश्यक आहे.यासाठीच हा लेख प्रपंच!
माझ्या यापुर्वीच्या लेखात खालील विषयांना मी काही प्रमाणात हात घातला होता.
लहान ठेविदार हाच पाया
आपल्या पतसंस्थेत ठेविदारांची संख्या कशी वाढेल यावर भर देणे आवश्यक आहे.लहान लहान रक्कमांचे ठेविदार हेच संस्थेच्या सक्षमिकरणाचे शिलेदार असतात.आपल्या संस्थेच्या गत वर्षातील एकुण ठेवींच्या फक्त 1% रक्कमेच्याच ठेवी काही प्रमाणात स्विकारताना ते ठेविदार 10 पेक्षा जास्त नसतील हे कटाक्षाने पाळा नव्हे हा दंडक आपण घालुन घ्या.
उदाहरणा दाखल…
एका संस्थेच्या गत वर्षातील एकुण ठेवी 50,00,00,000/-(पन्नास कोटी) आहेत.अशा वेळी त्यांचा मोठ्यात मोठा ठेविदार हा 50,00,000/- (पन्नास लाख) पेक्षा जास्त नसावा.तर एकत्रीत कुटुंबासाठी दिड टक्केच म्हणजे 75,00,000/- लाख जास्तीत जास्त असावा.शिवाय असे ठेविदार 10 पेक्षा जास्त नसावेत.
कारण कुठल्याही ठेविदाराला आपल्या पैशाची गरज कधीही पडु शकते,अशा वेळी त्यांनी सर्व ठेवी एकदम विड्राल केल्या तर संस्थेच्या लिक्विडिवर मोठा परिणाम होतो.याचे उदाहरणेही बरीच आहेत.आपणाकडे असे मोठे 20 ठेविदार असतील व आपण एक कोटी पेक्षा जास्त ठेवी घेतल्या असतील तर संस्थेवर त्याचा किती गंभीर परिणाम होईल याचा विचार करा.
यासाठी आपल्या संस्थेच्या साईज नुसार लहान लहान ठेविदार वाढवणे आवश्यक आहे.1 लाख ते 25 लाख पर्यंतचे ठेविदार तेही संस्थेच्या साईज नुसार संस्थेत असणे हे संस्थेच्या स्थिरता व सक्षमिकरणासाठी अती आवश्यक आहे.
लहान कर्जदारच संस्था स्थिर ठेवतो
आपण सर्वजण कर्ज वाटप करताना संबध(रिलेशन)बघतो.माझे असे मत आहे की,पेपर बरोबरच कर्जदाराचे नेचर संचालकांनी पहायला हवे.त्याचे उत्पन्न व फेडीची क्षमता अभ्यासायला हवी.
तारणी कर्ज वाटप हे सुरक्षित असेलही पण वसुलीतील समस्या आपण जाणतोच!संस्थेची साईज कशीही असु दया, बायलाॅज मध्ये एक्सप्लोझर लिमीट काहीही असले तरी मला असे वाटते….
कर्ज वाटप करताना मागिल आर्थिक वर्षातील ठेविंच्या अर्धा टक्काच तारणी कर्ज एका कर्जदाराला….कुटुंबाला दिले तर वसुलीतील पहिली लढाई तुम्ही जिंकलात अस समजा!
लहान कर्ज-बचतगट,स्माॅल फायनान्स हे चांगले,त्या बरोबरच भौगोलिक परिस्थिती नुसार सोन तारण/गोदाम तारण कर्ज हा सर्वोत्तम कर्ज प्रकार आहे,4 व्हिलर फायनान्स हेही चांगलेच!
मोठी कर्ज संस्थेच्या अस्तित्वालाच धोकेदायक
जेवढी मोठी कर्जै,तेवढा धोका जास्त.तो कर्जदार सर्वोर्थाने सक्षम असतो,कर्ज थकल्यावर कायदेशिर लढाई करण्याची मानसिकता व ताकद त्याच्यात असते.उपद्रवमुल्यात तो उच्चतम असतो.
आपण कितीही कर्जफाईल स्ट्राॅंग केली तरी असा कर्जदार थकल्यास संस्थेला मोठा फटका बसतो.
लहान लहान 20 कर्जै देण्यापेक्षा एकच सक्षम व मोठा कर्जदार चांगला ही आपली भावना व उद्देश!तो योग्य असेलही पण त्यात धोकाही वाढतो याचे भान संस्था चालकांनी ठेवायला हवे.
सरळ व स्वच्छ कर्ज वाटप प्रणाली थकबाकी कमी करते
पतसंस्थेची कर्ज वाटप प्रणाली सरळ,स्वच्छ व एकसारखी असावी.व्यक्ती सापेक्ष त्यात बदल हे संस्थेला अडचणीत आणतात.आपल्या पतसंस्थेची कर्ज प्रणाली ही नियमावली करुन,ती संचालक मंडळ सभेत,वार्षीक मिटींगमध्ये मंजुर करुन अमलात आणावी,त्यात बदल/फेरबदल कुणीही करणार नाही याची दक्षता घ्यावी.कर्जदारांच्या कुठल्याही प्रलोभनांना आपली यंत्रणा बळी पडणार नाही याचेवर नियंत्रण असायला हवे.कर्ज फाईल तयार करताना/वाटप करताना झालेल्या चुका ह्या थकबाकी वाढवतात.
श्री.वासुदेव काळे,सहकार सल्लागार व व्याख्याता
मो.नं.9822837025
दि.1 जून 2024
संचालक-महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
अध्यक्ष सहकार भारती,अहिल्यानगर(उ) जिल्हा