संत नागेबाबा

सहकार विश्व

अधिकारी प्रशिक्षण

“Say No”

पतसंस्था अधिकार्‍यांनी हे शिकायला हवे
पतसंस्थेतील अधिकार्‍यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे.हे शिकवले जात नाही. training मधे असे शिकवले जाते पण आपण तिथे समजुन घेत नाही तर फक्त एकतो.त्यामुळे हे लक्षात राहात नाही.
आणि इथेच पतसंस्थेतील कर्मचारी, अधिकारी, मॅनेजर,CEO कमी पडतो. Selection of borrower ही NPA controlling ची पहिली step असते. आणि कर्जदार निवडताना जर माझा अधिकारी मी तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही,आमच्या नियमात हे बसत नाही असे सांगु शकला पाहिजे.
पण नेमके काय होते — संचालकाचा फोन होता, कोणत्या नेत्यांचा फोन होता, थोडा परिचयाचा असतो,अध्यक्षांनी सांगितले आहे मग मी नाही कस म्हणू असा विचार करुन तुम्ही चक्रव्युहात अडकता.
हीच सर्व ठिकाणची अडचण आहे. म्हणून लक्षात घ्या
Say No
म्हणायला शिकायलाच हवे.
प्रिय सहकारी मित्रांनो
माझे मत असे आहे,
संस्थेचा विचार करून नाही म्हणा,असे मी म्हणनार नाही. तर
स्वतःसाठी नाही म्हणा –
कारण या चक्रव्युहात अडकल्यावर तुम्हाला बाहेर पडणे अवघड होईल. स्वतःचा विचार केला तरी यातुन तुम्ही संस्थेच्या हिताचेच काम करणार आहात.
महत्वाचा मुद्दा — आता पतसंस्थांनी काळा बरोबर बदलुन CBF (security base finance) कर्ज वितरण करणे थांबवायला हवे. व्यवसायीक प्रगती, परत फेडीची क्षमता व सभासदाचे नेचर पाहुन कर्ज वाटप करा.त्यामुळे समस्या कमी होतील.आणि याही पेक्षा महत्वाचे
तुम्ही उंटाचा मुका घ्यायला जावुच नका
छोटे छोटे कर्जदार शोधा.आपल्या पतसंस्थेची ताकद ओळखा,क्षमता तपासा व ते या गणितात बसते का? हे पहा.
आपली साईज काय आहे, तुमची सिंगल कर्ज मर्यादा किती आहे.तुम्ही मोह आवरला पाहीजे.नको त्याला पोटनियम बाह्य कर्ज वाटु नका. खाते NPA गेल्यावर तुम्ही नियम बाह्य कर्ज दिले असेल तर धोक्याची घंटा वाजते.
NPA वाढेल असे वाटपच का करता? पतसंस्था का व कशासाठी सुरु झाल्या आहेत,याचाच विसर आपल्याला पडलाय. कशासाठी निघाल्या आहेत तर तळागाळातील,लहानात लहान व्यक्ती पर्यंत पोहचून सामाजिक उन्नती करण्याचं तुमचे ध्येय ना? मग त्याच काय झालं पुढे ?
चुकीचे काम करणाऱ्या पतसंस्थांवर,संचालक मंडळावर कारवाई होईलच,काही मोजक्याच पतसंस्थाचा व त्या चालवणार्‍या धुरीनांचा हा दोष आहे.ही किड सहजा सहजी जाणार नाही.
चांगले काम करणार्‍यांनाच बदलावे लागेल
कारण जे नियमा नुसार व पोटनियमा नुसार काम करतात,याच्यावर देखील याचा परिणाम होणार आहे.
भविष्यात काय होणार आहे,ते आपणास समोर दिसते आहेच.
आताच सावध व्हा,सुधारणा करा.
अशा चुकांचा परिणाम काय होतो ते काही पतसंस्था व सहकारी बॅंकामुळे आपण हे पहात आहोतच.आता सुधारणांकडे पहा .
गोरगरीब,सामान्य लोकांचा हा पैसा आहे,हे लक्षात ठेवा.काळ कुणालाच माफ करत नसतो,हे आपण बघतोच!
यासाठी आजच कर्जदार शोधताना NPA चा विचार करा! मार्च जवळ येत आहे,त्यामुळे सावध व्हा!!
——————————————-

वासुदेव काळे,श्रीरामपूर,सहकार व्याख्याता व सहकार सल्लागार
मो.नं. 9822837025

error: Content is protected !!