संत नागेबाबा

सहकार विश्व

Unclaimed Deposit

बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं अचानक निधन होतं. आपल्या हयातीत त्या व्यक्तीने विविध बँका मध्ये Savings a/c, Current a/c, FD, RD च्या स्वरूपात काही गुंतवणूक केलेली असते. त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसाला कदाचित काही बँक खात्यांची माहिती नसेल तर त्या बँकांकडे Claim केला जात नाही. ती खाती/मुदत ठेवी मग तशीच पडून “Inoperative” होतात आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे जर १० वर्षा पेक्षा जास्त काळ एखादं खातं Inoperative राहिलं तर ते RBI कडे Unclaimed Deposit म्हणून जमा केली जातात.

रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला त्यांच्या कडे असलेली अशा “Unclaimed Deposits” ची यादी त्यांच्या वेबसाईट वर टाकायची असते. पण वारसाला जर माहितीच नसेल तो शोध घेण्याचा प्रश्नच नाही. बँकांनी स्वतः शोधाशोध केली/पत्र व्यवहार केला तरच कळू शकेल. अन्यथा हे पैसे RBI कडे असेच पडून राहतील.

आता RBI ने udgam.rbi.org.in ही वेबसाईट तयार केली आहे ज्यात २९ राष्ट्रीयकृत + खाजगी बँकेकडे असलेल्या अशा “Unclaimed” खात्याचे तपशील उपलब्ध आहेत.

ही माहिती काढण्यासाठी संबंधित मृत व्यक्तीचे संपुर्ण नाव आणि जन्म तारीख लागेल. तसेच या सोबत Pan No/Voter Id No/Driving Licence No/Passport No या पैकी एकाची गरज पडेल.

वरील सर्व तपशील टाकल्यावर संबंधित व्यक्तीच्या नावाने काही “Unclaimed” खातं सापडलं तर वेबसाईट ते बँकेच्या नावासकट दाखवते. त्यात दिलेला संदर्भ क्रमांक घेऊन आपण त्या बँकेत जाऊन Claim ची प्रक्रिया पुर्ण करायची आणि पैसे घ्यायचे.

टीप: मला स्वतःला या website वरून माहिती मिळवून फायदा झाला आहे.

मंदार जोशी

error: Content is protected !!