पतसंस्था मधिल CEO/मॅनेजर कसा असावा
पतसंस्था चळवळ सध्या विवीध प्रश्नांना सामोरे जात आहे.या चळवळीत चांंगले,हुशार,अभ्यासु स्टाॅफ मिळत नाही,मिळाला तर टिकत नाही अशी मॅनेजमेंटची खंत आहे.
या सर्वात महत्वाचा घटक पतसंस्था मधीलCEO /मॅनेजर आहे.त्याच्या मार्गदर्शना खाली पतसंस्था व सहकारी कर्मचारी अगदी संचालक मंडळही काम करत असते.अशा वेळी CEO/मॅनेजर यांची भुमिका व महत्व मोलाचे आहे.मग तो कसा असावा हे ही महत्वाचे आहे.
टेक्नोलॉजि-संगणकतंज्ञ
आता 90% संस्थामध्ये संगणकप्रणाली वापरली जाते,नव्हे वापरावी लागणारच आहे.अशा वेळी मॅनेजर त्यात परिपुर्ण असावा.साॅफ्टवेअर कुठलेही असले तरी ते वापरण्या बरोबरच त्याचे ज्ञान व माहिती मॅनेजरला असायलाच हवी.यासाठी पतसंस्थेत पुर्णवेळ बसुन सिस्टीमवर त्याची कमांड असली पाहीजे.इतर स्टाॅफ पेक्षा त्याचे संगणकातील ज्ञान व प्रॅक्टीस जास्त असायला हवी.सर्व रिपोर्टस काढता यायला हवेत,महत्वाचे आपल्या साॅफ्टवेअर मध्ये काय काय आहे व ते कसे वापरायचे याची माहिती असली पाहिजे.
सहकारातील कायदे-बॅंकींग मधील ज्ञान व अभ्यास
सहकार कायदा 1960-61 कायदा व कलम याचा अभ्यास असायला हवा.नियामक मंडळ,परिपत्रके,कायदयात होणारे बदल या बाबत अपडेट असायला हवा.
पतसंस्था बॅंकींग व्यवहार करतात,त्यामुळे बॅंकींग बाबत,व्यवहारांबाबत,सर्व माहिती असण्या बरोबरच सहकारी स्टाॅफलाही त्याला ट्रेन करता यायला हवे.डिजीटल,फिजीकल बॅकींग तोंडीपाठ असावे.तसेच नियमीतपणे होणारे बदल,त्याचा आपल्या पतसंस्थेवर होणारा परिनाम याचा अभ्यास त्याला असायला हवा.बॅंकींग बदलते आहे,फेसलेस बॅॅंकींग भविष्यातील आर्कषण असेल,बॅंकींगमध्ये AI चा वापर वाढणार आहे,त्याला स्विकारण्या बरोबरच सामोरे जाण्याची आपल्या सर्व सहकारी स्टाॅफला साथ व सहकार्य करण्या बरोबरच स्वतःला 100% तयार करणारा असावा.
बॅंकींग गोपनियता व जबाबदारीचे भान
आर्थिक संस्थेत काम करत असताना सभासद, ग्राहक व पतसंस्था यांच्या हितासाठी व्यवहारीक गुप्तता पाळण्याची महत्वाची जबाबदारी मॅनेजर वर असते.संस्था हिताला प्राधान्य देताना गोपनियता पाळणे अत्यंत आवश्यक असते.व्यवसायिक ट्रान्सफरन्सी सांभाळताना सोबतच्या स्टाॅफलाही ही शिकवणुक दयायला हवी.
प्रत्येक व्यवहाराची जबाबदारी व अंतीम दायित्व CEO/मॅनेजर वर असते,त्यामुळे डोळ्यात तेल घालुन काम करण्याचे भान त्याला असायला हवे.
जनसंर्पकाची आवड व 24 तास संस्था त्याच्या डोक्यात हवी
CEO/मॅनेजर यांच्या डोक्यात-मनात संस्था 24 तास असायला हवी,म्हणजे तो100% पुर्णवेळ पतसंस्थेचा मॅनेजरच असावा.त्याने इतर कुठलाही व्यवसाय करण्यास प्राधान्यक्रम दयायला नको.जर 24 तास पतसंस्था डोक्यात असेल तर होणारे बदल,संस्थेच्या प्रगतीसाठी झोकुन देण्याची तयारी देखील हवी.
हसतमुख व मितभाषी
CEO/मॅनेजर हा सतत हसतमुख व मितभाषी असला पाहीजे.कुठल्याही ग्राहकाला,सभासदाला वारंवार त्याला भेटावे असे वाटायला हवे.त्यांचा पतसंस्थे व्यतिरीक्तही कुठला प्रश्न फक्त हाच माणुस सोडवु शकतो,मार्गदर्शन करु शकतो अशी धारणा ग्राहकाची असायला हवी.भाषा अंत्यत लाघवी व नम्र असण्या बरोबरच चेहरा कायम प्रसन्न व हसतमुख कसा राहील याचा भान मॅनेजरला असायला हवे.
सहकारी स्टाॅफ बरोबरचे मधुर सबंध
आपल्या पतसंस्थेतील सर्व स्टाॅफ बरोबर मॅनेजर यांचे संबध मित्रत्वाचे,मधुर,कुटुंबातील जेष्ठ सदस्या सारखे असायला हवेत.रोजचे रोज सर्व स्टाॅफशी संवाद व्हायला हवा,शाखा जास्त असतील तर रोज शाखाधिकारी यांचे बरोबर फोनवर तरी बोलायला हवे.2/3 शाखा असतील तर रोजच सर्वांशी संवाद व्हायला हवा,जास्त शाखा असतील तर एकत्रित अथवा शाखास्तरावर महिन्यातुन किमान एकदा मिटींग मॅनेजर यांनी घ्यायला हवी.त्यांचे प्रश्न जागेवर सोडवण्याचे कसब त्याचेकडे असावे न की,प्रश्न वाढवण्याचे!मॅनेजमेंट व स्टाॅफ यांच्या मधील दुवा म्हणुन महत्वाची भुमिका पार पाडण्याची जबाबदारी मॅनेजरची असते.
कल्पकता,नियोजन व दुरद्रुष्टी
पतसंस्थेतील CEO/ मॅनेजर हा कल्पक असावा,संस्थेतील सभासदांसाठी अभिनव अशा ठेवींच्या,कर्जाच्या योजना त्याने तयार करुन संचालक मंडळापुढे ठेवुन,त्यानां समजावुन त्या मंजुर करुन घेण्या बरोबरच सहकारी स्टाॅफला योजना राबवण्याचे ट्रेनिंग देण्याचे कसब त्याच्याकडे असावे.पतसंस्थेच्या वृध्दीसाठी त्याने सतत प्रयत्न करताना ठेवी स्विकारणे, कर्ज देणे व वसुली यावरच भर देण्याचे नियोजन त्याने सातत्याने करायला हवे.प्रत्येक कामाचे,कृतीचे संपुर्ण आर्थीक वर्षाचे नियोजन त्याचेकडे लिखीत स्वरुपात असायला हवे.
मॅनेजर हा दुरद्रुष्टी असणारा असावा.पुढील किमान तिन वर्षात आर्थीक क्षेत्रात होणारे बदल,त्यामुळे आपल्या पतसंस्थेवर होणारे बरे-वाईट परिणाम यांचा आराखडा त्याचेकडे असायला हवा.पैशाची उपलब्धता,वितरणाची काळजी व वसुलीची जबाबदारी याचे त्याने प्लॅनिंग करायला हवे.सध्याच्या दोलायमान परिस्थीतीत त्याने आपली गुंतवणुक सक्षम बॅंकातच करायला हवी व त्या बॅंकाचा अभ्यासही असायला हवा.मागता क्षणी पैसे परत देण्याची हमी हे बॅंकींगचे पहिले तत्व आहे.हे लक्षात ठेवायला हवे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष-संचालक यांच्या बद्दल आदरभाव
पतसंस्थेचे संचालक मंडळ व अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्या नावावर,विश्वासावर संस्था चालत असते.आपलीही निवड त्यांनीच केलेली असते.त्यांना यदाकदाचित सहकारातील ज्ञान,माहिती कमी जास्त असु शकेल पण व्यवहारज्ञान प्रचंड असते.त्यांच्या सुचनांचा आदर करणे,अंमलबजावणी करणे ही महत्वाची जबाबदारी मॅनेजरची असते.रोजचे रोज व्यवहारीक अपडेट अध्यक्षांना देणे,त्यांच्या बद्दल सकारात्मकता स्टाॅफमध्ये ठेवण्याची महत्वाची जबाबदारी मॅनेजरची असते.कारण डेटुडे मॅनजरच अध्यक्षांच्या संर्पकात असतात,कामातील चुका,शिस्त,जबाबदारी,कर्तव्यातील कसुर याबाबत ते मॅनेजरशी बोलतात,रागवतातही!
अशा वेळी आपल्या व आपल्या सहकार्यांच्या चुका सुधरण्याची जबाबदारी मॅनजेरची असते,न की अध्यक्षां बद्दल गैरसमज,नकारत्मतकता,सहकारी स्टाॅफमध्ये पसरवण्याची!! संचालक मंडळाचा योग्य सन्मान,मान ठेवण्याचे भान त्याला असायला हवे.
पतसंस्थेप्रती निष्ठा
आपण जेथे काम करतो,आपला उदरनिर्वाह ज्यावर अवलंबुन आहे,आपल्याला मिळालेली सामजिक प्रतिष्ठा,आर्थिक सुबत्ता यात पतसंस्थेचा मोठा वाटा आहे.हे लक्षात ठेवतानाच पतसंस्थेला आपल्या आईसारखा मान व अपत्यासारखी संभाळण्याची,वाढवण्याची जबाबदारी लक्षात असायला हवी.पतसंस्थे प्रती 100% निष्ठा असणे हे पहीले कर्तव्य मॅनेजरचे आहे.ज्यावेळी मॅनेजर अशा पध्दतीने आचरण करेल त्याच वेळी सर्व सहकारी स्टाॅफ आपोअप आर्दश घेतील.अन्यथा पतसंस्था,मॅनेजर व स्टाॅफ यांचे भवितव्य दोलायमान असेल.
स्वच्छता, राहणीमान व वर्तणुक
पतसंस्था स्वच्छ,प्रसन्न,व्यवस्थित असायला हवी, संस्थेत सफाई कामगार नसेल,गैरहजर असेल तरीही हे आपलेच काम आहे,याची जाणीव ठेवुन पतसंस्थाची स्वच्छता ठेवण्याचे वृत्ती त्याने सर्व सहकारी कर्मचार्यात रुजवायला हवी.तसेच मॅनेजरचे राहणिमान,देहबोली,उत्साही व दिशादर्शक असावी.ड्रेसकोड आजकाल सर्वत्र सुरु झाले आहेत,परंतु स्वच्छ धुतलेले,प्रेस केलेले कपडे असावेत.पुरुष मॅनेजरने रोज दाढी केलेली असावी,केसांची योग्य ठेवण व योग्य पायतणे असावेत.तर महिला मॅनेजर यांनी समाजमान्य पेहराव करावा.केशभुषा व वेष भुषा आर्दश असावी.सहकार्यांना मॅनेजरचा आर्दश घ्यावा असे वर्तन त्याचे असावे.
मोबाईलचा अति वापर टाळण्या बरोबरच हेडफोन,ब्ल्युटुथ यांचा वापर पतसंस्थेत कसा कमी होईल याची मानसिकता सर्व सहकार्यात त्याने तयार करायला हवी.
वासुदेव काळे,श्रीरामपूर,कुटुंब प्रमुख-श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवार
मोबा.न.9822837025
दि.7 मे 24
संचालक-महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
संचालक-महाराष्ट्र स्टेट को-आॅप डेव्हलपमेंट& वेलफेअर असोसिएशन
अध्यक्ष-सहकार भारती,अहिल्यानगर (उ)जिल्हा