आपत्ती-पतसंस्था चळवळीतील
👇👇👇👇👇👇👇👆👇
आपल्यात निकोप स्पर्धा आहे की आसुया युक्त
स्नेहीहो,जय सहकार
आपण सर्वच जण आर्थीक क्षेत्रात म्हणजे काचेच्या घरात राहणारी माणसं!समाजात वाईट लोकांपेक्षा चांगल्या लोकांचे प्रमाण जास्त अस म्हटल जात,अन त्यावरच हा समाज टिकुन आहे अस आपण नेहमी म्हणतो.तेच आपल्या चळवळीला ही लागु होते.
आपल्यातही चांगली कामे करणारे- खुप चांगली कामे करणारे-टेक्नाॅलाॅजीचा वापर करणारे- सहकारी-पतसंस्था आहेतच!
त्यांची प्रसिध्दी केली, त्यांच्या बद्दल चांगले आपल्याच ग्राहकानां सांगीतले तर,ही चळवळ सुद्रुढ होईल,पण आपण असुयेपोटी काही तरी मालमसाला लावुन आपल्याच सहकार्यांची चुकीची माहिती पसरवतो अन म्हणतो निकोप स्पर्धा!
या एवजी ते कसे काम करता,चुकांचे प्रमाण कमी कसे केले आहे,आपत्त कालीन व्यवस्थापन यंत्रणा कशी आहे यासाठी
त्यानां भेटी दिल्या त्या कशा मोठ्या झाल्या त्या कस कामकाज करतात हे प्रत्यक्ष जावुन पाहिले तर आपल्यातील निगेटेव्हिटी कमी होवु शकते.
समाजात दोन बाजु असतातच.चुकीची कामे करणारी,हेतुच चुकीचा ठेवुन चळवळीत येणारी प्रवृत्ती असणार आहेच.ती थाबवणे अशक्यच! म्हणुन भयभित होवुन चालेल का?
माझी सर्वांना एक विनंती आहे,
आपआपसात एकमेकां बद्दल गैरसमज पसरवु नका,पुर्ण माहिती घेण्यापुर्वी गाॅसिपींग करु नका🙏
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व सहकार भारती या आपल्या संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहाण्यासाठी नेहमीच तयार असतात,
फक्त तुम्ही सच्चे व पक्के हवेत. बर्याचदा आपण वृत्तपत्रात आलेल्या बातम्या,नवनविन चॅनलवर पतसंस्थाच्या गैरकारभाराच्या,होणार्या अफरा तफरीच्या बातम्या वायुवेगाने फाॅरवर्ड करत असतो.
त्याचा परिणाम चांगल्या संस्थाकडेही समाज संशयाच्या नजरेने पाहाण्यावर होतो.हे टाळु शकु का?
त्या संस्थेच्या आलेल्या बातम्या हायलाईट करुन आपण आपल्याच ईतर सहकार्यानां अडचणीत आणत असतो,याचे भान राखायला हवे.
गैरकारभार-अफरातफर-चुकीचे व्यवस्थापन या गोष्टी होत राहाणारच.
अपघात होतात म्हणुन कुणी प्रवास सोडलाय का? अपघात होतात म्हणुन गाड्यांची विक्री थांबली आहे का? नाही ना…
तसेच आपणही या लोकाना सोडुन पुढे जायला हवे.सहकार खाते,शासन यांच्या कडुनही आपण नेहमीच सुईच्या टोकावर असतो.
अशा वेळी उत्कृष्ट व्यवस्थापन,प्रशिक्षीत कर्मचारी व अधिकारी लागतील.तर संस्थेसाठी वेळ देणारे संचालक मंडळ,पुर्णवेळ देणारे पदाधिकारी असणे हाच यशाकडे नेणारा मार्ग असेल.सहकार सुद्रुढ व्हावा असा केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा प्रयत्न आहेच!पतसंस्था चळवळीला भविष्य चांगले आहे,परंतु आपल्यातील अपप्रवृत्ती या पतसंस्था चळवळीला मारक आहेत.
यासाठी चांगले काम करणारे आपले सहकारी हे आपले आयडाॅल असायला हवेत
त्यांच्या कामाचा प्रपोगंडा सर्वत्र आपण करायला हवा न की,चुकीच्या काम करणार्यांचा!
एखादया चुकीमुळे संस्था अडचणीत येतात,आपण आर्थिक क्षेत्रात आहोत,समाजभान ठेवायला हवे.
वेळप्रसंगी अडचणींना सामोरे जाणार्या संस्थाना मदतीचा हात दयायला हवा.
संस्था मधुन बाहेर पडणारे संचालक,कर्मचारी यांनी स्व पेक्षा संस्था महत्वाची याचे भान ठेवायला हवे,आपण बाहेर पडलो की,संस्थेची बदनामी करायची ही वृत्ती घातक आहे,यावर वचक आणुन सर्वांनी अशा वृत्तींना खतपाणी न घातला आळाच घालायला हवा
हितचींतकाचे प्रमाण संस्था मोठी झाली की,वाढते हे लक्षात घेवुन कर्मचार्यांनी जबाबदारीने वागायला हवे.
श्री.वासुदेव काळे,श्रीरामपूर
कुटुंब प्रमुख-श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवार,श्रीरामपूर
संचालक-महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन
मो.नं.9822837025
दि.21 सप्टेंबर 23