संत नागेबाबा

सहकार विश्व

!!नागेबाबा मल्टिस्टेटच्या मयत सभासद यांच्या वारसास नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दहा लाख रूपयेचा धनादेश प्रदान!!

!!नागेबाबा मल्टिस्टेटच्या मयत सभासद यांच्या वारसास नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दहा लाख रूपयेचा धनादेश प्रदान!!

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे सर यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करत आहे. संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे. याचा विचार करून आपल्या संस्थेतील सभासदांसाठी नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजना चालू केलेली यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसांना 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते तसेच अपघात झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. या योजनेतून त्या कुटुंबाचा खरा आधार देण्याचे काम संस्था करत असते. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट करंजी शाखेचे खातेदार सभासद कै.बाळासाहेब हिराजी क्षेत्रे यांचे मागील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच विमा अंतर्गत विमा केला होता. आज त्यांच्या वारसास 10,00,000/- अक्षरी दहा लाख रुपये किमतीचा धनादेश नागेबाबा मल्टीस्टेटच्या वतीने शाखेचे खातेदार व मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला. कै. बाळासाहेब क्षेत्रे यांच्या मागे पत्नी दोन मुलं व दोन मुली असे कुटुंब आहे. यावेळी करंजी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रफिक शेख साहेब, सुनिल शेठ साखरे,आबासाहेब अकोलकर,जालिंदर वामन,रावसाहेब मुरडे,सुरेश नाना साखरे ,मिर्झाजी मणियार,छगनराव क्षेत्रे,उत्तम अकोलकर,वसंत क्षेत्रे, संदीप अकोलकर,झुंबरराव मराठे,पत्रकार विलास मुखेकर,तुळशीदास मुखेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!