पतसंस्था मधील ठेवीदार कोण ? व्याजदरही महत्वाचाच !!
सहकार चळवळीतील मान्यवर सहकारी ,सस्नेह … ठेवींच्या व्याजदराचा मुद्दा नेहमीच एरणीवर आलेला असतो. खर तर शासनाने(नियामक मंडळाने) परिपत्रक काढुन जास्तीत जास्त 10% व्याजदर पतसंस्थांनी ठेवींवर दयावेत असे अधोरेखीत केले आहे..आता मुळ मुद्दा.
व्याजदर ठेवींचे व कर्जांचे..
सध्याच्या परिस्थीतीत कुठल्याही बॅंका,पतसंस्था यांचे कडे अपेक्षीत कर्जदार नाहीत…(चांगले_वाईट नंतर ठरवु या!) त्यामुळे कर्ज वाटपा साठी ना ना विध योजना व कल्पना राबवण्याची वेळ आपणावर आली आहे.
अशातच वसुलीचाही आनंदच आहे…त्यात नॅशनलाईज बॅंका,सहकारी बॅंकाना वसुली बाबत शासन,RBI देत असलेल्या सुचना! (त्याचा आपल्यावरही होणारा परिणाम)…तशातच आपण गुंतवणुक करत असलेल्या…ठिकाणचे घटलेले व्याजदर व त्याचा आपल्या त्या बॅंकातील गुंतवणुक व्याजदरावर झालेला मोठा परिणाम !! यामुळेच व्याजदर कमी करण्याचा चाललेला आपला व आपल्या चळवळीतील धुरीण अभ्यासकांचा प्रयत्न व प्रस्ताव.. योग्य आहे का? याचा विचार करावा लागेल.
पण पतसंस्था मधिल ठेवीदार कोण ? या मुलभुत प्रश्नांचा आधी अभ्यास करावाच लागेल …आपले ठेवीदार हे जेष्ठ नागरीक,.गुंतवणुकीतुन कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करणारा परिवार,पतसंस्था चालकांवर विश्वास असणारा स्थानीक वर्ग व सर्वात महत्वाचा ठेवीदार हा २/३ % जास्त व्याजासाठी पतसंस्थांत गुंतवणुक करणारा आहे. त्यांचा विचार आपल्याला करावा लागेल.अर्थव्यवस्थेचा क्रमशः विचार केला तर सर्वात वरची RBI,सरकारी बॅंका, खाजगी बॅंका,व्यापारी बॅंका,सहकारी बॅंका व शेवटची संस्था..पतसंस्था! यांच्या व्याजदरात१ ते १॥% फरक सुरवाती पासुन क्रमशः दिसतो..हा काळ आपले ठेवीदार लाॅंगर्टम संभाळण्याचा,त्यानां आधार देण्याचा आहेच,एकदा गेलेला गुंतवणुकदार परत येणे त्रासदायक नव्हे अवघड असते. त्याच बरोबर एकुण पतसंस्थांच्या 80 % पेक्षा जास्त संख्या असलेल्या लहान(२०कोटीच्या आतील) पतसंस्थांना आधार देण्याचा,सहकार्य करण्याचा व त्यांचे अस्तीत्व टिकवण्यासाठी मदत व मार्गदर्शन करण्याचा आहे..कारण त्या त्यांच्या परिसरातील मोठ्या,जुन्या,नामवंत पतसंस्थापेक्षा ठेवींवर या लहान संस्था १ ते २% व्याजदर जास्त देतात,..छोटया,स्थानीक कर्जदारानां त्वरीत कर्ज पुरवठा करतात म्हणुनच त्या टीकुन आहेत नव्हे त्यांचा रेशोही बर्या पैकी मेंटन आहे असे लक्षात येते.हा मुद्दा मी नेहमीच मांडत असतो…त्यामुळे व्याजदर कमी व्हावा या मागणी सोबत लहान पतसंस्थांचे अस्तीत्व व ठेवीदारांची मानसीकता संभाळुन हा विचार होणे आवश्यक आहे असे वाटते..
कुर्हाडीचा दांडा———
या प्रमाणे आपल्यातीलच मोजक्या अपप्रवृत्ती या चळवळीला घातक ठरत आहेत.त्यांच्या संस्था चुकीच्या कार्यपध्दतीमुळे,चुकीच्या व्यवस्थापना मुळे अडचणीत येतात पण त्रास सर्वांना होतो.यासाठी आता विचार करावा लागेल.
जोखीम व आपत्त कालीन व्यवस्थापन
यासाठी सर्वांनाच आता काम करावे लागेल,फेडरेशन-सहकार भारती या व्यासपीठांवर हा मुद्दा मी वारंवार उपस्थित करत आहे.नुसते ठेवींना संरक्षण मिळुन फारसे काही निष्पन्न होणार नाही कारण संरक्षण प्राप्त रक्कम 1 लाखांपेक्षा जास्त नसेल हे शासनाच्या आता पर्यंतच्या सकारात्मक भुमिकेतुन जाणवते आहे.
कर्जदाराचा अभ्यास करुन,फेडीची क्षमता,कर्जदाराची वृत्ती,तारण मालमत्ता याचा विचार करुनच कर्ज वाटप करणे व पहील्या हप्त्या पासुनच वसुलीसाठी पाठपुरावा हे धोरण राबवावे लागेल.
गोदाम तारण,सोन तारण हे भौगोलीक परिस्थीती वर अवलंबुन असुन सुरक्षित परंतु कमी व्याज व नफा देणारा हा कर्ज प्रकार आहे.
ठेवींचे व्याजदर व कर्जाचे व्याजदर याची सांंगड घालताना हा विचार करावा लागेल.
आपण सर्वजण या चळवळीतील धुरीण आहात. या लेख प्रपंचाचा योग्य विचार करावा.
आ.वासुदेव काळे.
मो.नं.९८२२८३७०२५
गुरुवार दि.22 जून 23