सूमारे तीन दशकापूर्वी महाराष्ट्र मध्ये पतसंस्था स्थापन करण्याची एक मोठी लाट येऊन गेली. त्या काळामध्ये छोट्या – मोठ्या पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण शहरी तसेच विविध प्रकारच्या नोकरवर्गांनी पतसंस्था स्थापन केल्या. काही पतसंस्थांनी चांगली प्रगती करून आज त्यांचे रूपांतर मल्टीस्टेट व बँकेमध्ये झाल्याचठ उदाहरणे आहेत. तथापि बहुतांशी पतसंस्था पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून मोडकळीस आणल्या. ग्रामीण भागामध्ये आर्थिक परिवर्तन पतसंस्थेमार्फत होईल व नडलेल्या तसेच अडलेल्या व्यक्तींना त्याचा लाभ होईल आणि त्यांची प्रगती होईल अशी परिस्थिती अवलोकनार्थअपेक्षित होती. काही पतसंस्था भार न देता आधार देतात ही खरोखर भूषणाची बाब आहे. तथापि अनेक पतसंस्थांनी भ्रष्टाचार करून व संस्था दिवाळखोरीत दाखवून अनेकांच्या ठेवीचा फार मोठा प्रश्न निर्माण केला. अर्थशास्त्राच्या नियमानुसार कारभार झाला नाही. काटकसर तसेच नियमित अर्थपुरवठा आणि त्याची वसुली या गोष्टी एकमेकास पूरक आहेत. काही पतसंस्थांनी पथ्य पाळून संस्थेला तळहातावर जपले. त्यांची आज भरभराट दिसून येते. पतसंस्था विधायक व समाज उपयोगी त्याचबरोबर संस्थेची उन्नती असा ठेवला गेला त्यांची प्रगती झाली. दुर्दैवाने मोठे पुढारी भ्रष्टाचार करतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छोट्या पुढाऱ्यांनी पतसंस्थांमध्ये फार मोठी घोडचूक केली. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी जास्त व्याजदराची प्रलोभने दाखवून ठेवी जमा केल्या. दुर्दैवाने आज त्यांच्या ठेवी परत देणेही अवघड झाले आहेय या सर्वांच्या मुळाशी भ्रष्टाचार हेच एकमेव कारण आहे. त्याचबरोबर संस्थेचे अयोग्य अहमदनगर जिल्ह्यातील एका पतसंस्थेमधील भ्रष्टाचाराबद्दल फार मोठी जन्मठेप सारखी शिक्षा झाल्यामुळे अनेकांना धका बसला असेल. तथापि यातून आपण काय शिकणार हा प्रश्न खरा महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचार करून पापरुपी शिखरावर गेलेल्या अनेकांचे प्रपंच उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यातून योग्य बोध घेणाऱ्यांनी समाजापुढे तात्विक तसेच मौलिक व वैचारिक विचारधारा मांडणे ही खरी काळाची गरज आहे. प्राचार्य डॉ. अशोकराव ढगे