सध्याचा काळ सर्व क्षेत्रात इव्हेंन्ट व प्रेझेंन्टेशनचा आहे.विवीध उद्योगात,व्यवसायात,कार्पोरेट, प्रायव्हेट,कर्मशियल बॅंकिंग सेक्टर मध्ये या साठी विशेष आर्थिक तरतुद तर केली जातेच पण यासाठी तंज्ञ स्टाॅफ,एजन्सिजची ही नियुक्ती केलेली असते.
या बाबत सहकार क्षेत्र फार माघे आहे.केंद्र सरकार सहकारा बाबत सकारात्मक असुन नवनवीन योजनांच्या माध्यमातुन ते लक्षात येते.देशातील,राज्यातील 30%+ लोकसंख्या विवीध माध्यमातुन सहकाराशी जोडलेली असीनही त्याचा फायदा अथवा लाभ सहकार क्षेत्राला घेता येत नाही असे नाईलाजास्त म्हणावे लागेल.
या स्पर्धात्मक कालखंडात सहकार क्षेत्राने विशेषतः सहकारातील बॅकिंग सेक्टरने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पतसंस्था चळवळीत साधारणतः 13,000/-+ पतसंस्था आहेत व हा या क्षेत्रातील सर्वात मोठा आकडा आहे.
पतसंस्थानी प्रेझेंन्टशन व इव्हेंट मंनेजमेंट याकडे सकारात्मकपणे पहाणे अतीव गरजेचे आहे,आपली स्पर्धा खाजगी व व्यापारी बॅंकाशी आहे,ज्या विवीध माध्यमातुन ट्रेन व तंज्ञ स्टाॅफच्या मदतीने ग्राहकां पर्यंत पोहचत आहेत.
आपण यावर होणारा खर्च -खर्च न मानता गुंतवणुक मानायला हवी.संस्थेची जागा,इमारत,फर्निचर,रंगरंगोटी,स्टाॅफची बैठक व्यवस्था,त्यांचे राहणीमान,त्यांची भाषा,देहबोली,त्यांची बोलण्याची पध्दत,ग्राहकांना सेवा देण्याचा उत्साह,संचालक मंडळाची मानसिकता हे व असे बरेच घटक प्रेझेॅंन्टेशन मध्ये येतात.यासाठी पदाधिकार्यांचा पतसंस्था भेटीसाठी प्रवास,कर्मचार्यांचे अभ्यास दौरे,प्रशिक्षण या माध्यमातुन इतर पतसंस्था काय करतात व आपण काय करायला हवे याचे चिंतन होईल.
सध्याच्या काळात टिम म्हणुन सादरीकरण फार गरजेचे आहे.आपली पतसंस्था शिपाई यांचू पासुन अध्यक्षा पर्यंत कुणालाही ,कुठेही प्रेझेंन्ट करता यायला हवी,त्यासाठी वारंवार स्टाॅफ व संचालक यांच्या मिटींग मधुन व तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली योग्य सादरिकरण करणे,करता येणे हे महत्वाचे आहे.
त्याच बरोबर इव्हेंन्ट हा जनसंर्पकासाठी व ग्राहक वाढीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे.आपल्या संस्कृतीत विवीध सण-समारंभ मोठ्या उत्साहाने व आनंदाने ते ही वेळ देवुन साजरे केले जातात.पतसंस्था वाढीसाठी आपणही दर दोन महिंन्यांनी संस्थेच्या,शाखांच्या जागेत कार्यक्रम आयोजीत केले पाहिजेत.प्रत्येक कार्यक्रम साजरे करताना ग्राहकांची मानसिकता ओळखुन त्यांचे नियोजन व्हायला हवे.
दर कार्यक्रमातुन दरवेळी 100 नविन ग्राहक जोडण्याचे टारगेट शाखांना दयायला हवे.महिला,मुली,जेष्ठ महिला,मुले,पुरुष,जेष्ठ नागरिक यांच्या बरोबरच तृतिय पंथियां साठीही विशेष कार्यक्रम शोधायला हवेत.या कार्यक्रमानुसार विवीध स्पर्धा,व्याख्याने,सन्मानसोहळे,बक्षिस वितरण,गुणवंताचे सत्कार,महिला दिन,बालक दिन,जेष्ठ नागरीक दिन हे असे समयोजित कार्यक्रमांचे वर्षाचे कॅलेंडर तयार करुन त्या त्या कार्यक्रमास तो तो ग्राहक व भविष्यातील संभाव्य ग्राहक यानां निमंत्रित करुन संस्था समाजा पर्यंत पोहचवणे आवश्यक झाले आहे.यासाठी आपणस आता बदलावे लागेल.
विवीध एजन्सी,इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या,डिजीटलायझेशन व्दारे ग्राहक संपर्क करणार्या एजन्सीज बरोबर आऊट सोर्सिंग च्या माध्यमातुन यात लक्ष द्यावे लागेल.आपल्याला त्या दर्जाचा स्टाॅफ ही घ्यावा लागेल.ही बदलत्या काळाची गरज आहे,सबल व सक्षम पणे बॅंकिग चळवळ उंचीवर नेण्यासाठी हे गरजेचे आहे,असे मला वाटते.
लेखक-
श्री.वासुदेव काळे,कुटुंब प्रमुख-श्री सिध्दीविनायक पतसंस्था परिवार,श्रीरामपूर
मो.नं.9822837025
————————————-
संचालक-महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन,मुंबई
———————————
संचालक-महाराष्ट्र स्टेट को-आॅप डेव्हलपमेंट& वेलफेअर असोसिएशन,पुणे